शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 13 मे 2017 (10:22 IST)

भारतावर दहशतवादी हल्ला होऊ शकतो , अमेरिकेच्या गुप्तचर खात्याचा इशारा

पाकिस्तानमधल्या दहशतवादी संघटना भारत तसेच अफगाणिस्तानात हल्ला करायच्या तयारीत असल्याचा इशारा अमेरिकेच्या गुप्तचर खात्याने दिला आहे. जगभरात असलेला दहशतवाद्यांचा धोका याबद्दल अमेरिकी काँग्रेसला माहिती देताना राष्ट्रीय गुप्तचर विभागाचे संचालक डॅनियल कोट्स यांनी सांगितले की, दहशतवाद्यांचा बंदोबस्त करण्यास पाकिस्तानला अपयश आले आहे. या परीसरातल्या अमेरिकेच्या हितसंबंधांना या दहशतवादी संघटनांकडून धोका असल्याचे कोट्स म्हणाले आहेत. तसेच या दहशतवादी संघटना भारत व अफगाणिस्तानात हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची आपली माहिती असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे.