1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. , Thailand Fireworks Factory Explosion

थायलंडमध्ये फटाक्याच्या कारखान्यात भीषण स्फोट; ९ जणांचा मृत्यू

थायलंड फटाक्याच्या कारखान्यात स्फोट
थायलंडमध्ये एक दुःखद दुर्घटना घडली आहे. येथील फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अशी माहिती समोर आली आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी मध्य थायलंडमध्ये एका फटाक्याच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात किमान नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती दिली आहे.
बँकॉकपासून सुमारे ९५ किमी वायव्येस असलेल्या सुफान बुरी प्रांतात हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही.
Edited By- Dhanashri Naik
पुढील लेख
किरीट सोमय्या यांची घोषणा, ठाणे लाऊडस्पीकरमुक्त होईल