रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 सप्टेंबर 2021 (11:31 IST)

तालिबानला पुन्हा पाकिस्तानचा पाठिंबा मिळाला,ड्रोनच्या मदतीने बॉम्बस्फोट केले

तालिबान सध्या मजबूत स्थितीत आहे. तालिबानी लढवय्यांना बळजबरीने पंजशीर काबीज करायचे आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तालिबान आणि रेझिस्टन्स फोर्स मध्ये युद्ध सुरू आहे.तालिबानला पाकिस्तानचा पाठिंबा मिळाला आहे.पाकिस्तानी हवाई दलाने अनेक ड्रोन हल्ले केले आहेत, या मध्ये अनेक कमांडर ठार झाल्याची माहिती मिळत आहे.
 
रेझिस्टन्स फोर्स आणि तालिबान यांच्यातील युद्ध पंजशीर,अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे. तालिबानी लढवय्यांना बळजबरीने पंजशीर काबीज करायचे आहे. तालिबानने दावा केला आहे की त्याने पंजशीरवरही कब्जा केला आहे. यानंतर, पंजशीर रेझिस्टन्स दल थोडं  कमकुवत दिसते. रविवारी झालेल्या लढ्यात पंजशीरचे अनेक प्रमुख कमांडर मारले गेले. पाकिस्तानी हवाई दलाकडून पंजशीरमध्ये ड्रोन हल्ले करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या ड्रोन हल्ल्यात पंजशीरचे प्रवक्ते फहीम दश्ती मारले गेले. फहीम अहमद मसूदच्या खूप जवळचे होते. पाकिस्तान हवाई दलाने सुरू केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये मसूद कुटुंबातील कमांडरही ठार झाले आहेत.यामध्ये गुल हैदर खान, मुनीब अमिरी आणि जनरल वूदाद यांचा समावेश आहे. तालिबानने दावा केला आहे की त्याने संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला आहे. 
 
'पाकिस्तानी हवाई दलाने ड्रोनच्या मदतीने पंजशीरवर बॉम्बहल्ला केला आहे. यामध्ये स्मार्ट बॉम्बचा वापर करण्यात आला आहे. तालिबान आणि रेझिस्टन्स फोर्स गट त्यांचे स्वतःचे दावे आणि आश्वासने देत आहेत.तालिबान पंजशीरवर कब्जा केल्याचा दावा करत असताना,पंजशीर रेझिस्टन्स फ्रंटचा दावा आहे की ते सध्या पंजशीर त्यांच्या ताब्यात आहेत.पंजशीर प्रांत वगळता सध्या संपूर्ण अफगाणिस्तान तालिबान्यांनी काबीज केले आहे.