गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 29 मे 2022 (17:22 IST)

तारा एअरलाइनच्या बेपत्ता विमानाचे अवशेष सहा तासांनंतर मुस्तांग येथे सापडले, चार भारतीयांसह 22 जण होते विमानात

नेपाळच्या लष्कराचा हवाला देत मोठा दावा केला जात आहे. तारा एअरलाइन्सचे बेपत्ता विमान सापडल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळी लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे विमान मस्टँगच्या कोवांगमध्ये दिसले आहे. भारताचा शेजारी देश नेपाळमधील पोखरा ते जोमसोमला जाणाऱ्या तारा एअरलाइन्सच्या विमान 9 NAET चा संपर्क तुटला. या विमानाने सकाळी 9.55 वाजता उड्डाण केले. बेपत्ता विमानात चार भारतीय, तीन जर्मन आणि उर्वरित नेपाळी नागरिक होते. दुहेरी इंजिन असलेल्या विमानात चालक दलासह एकूण 22 प्रवासी होते. दरम्यान, एअरलाइनने सर्व प्रवाशांची यादी जाहीर केली आहे, ज्यामध्ये अशोक कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी त्रिपाठी अशी चार भारतीयांची नावे आहेत.
 
दरम्यान, नेपाळच्या लष्कराचा हवाला देत मोठा दावा केला जात आहे. तारा एअरलाइन्सचे बेपत्ता विमान सापडल्याचे सांगण्यात येत आहे. नेपाळी लष्कराच्या म्हणण्यानुसार, हे विमान मस्टँगच्या कोबान मध्ये दिसले आहे. नेपाळमधील प्रवाशांनी भरलेल्या बेपत्ता विमानाचा लष्कराने शोध घेतला आहे. हिमालयातील मानापथीच्या खालच्या भागात हे विमान दिसल्याची माहिती नेपाळ लष्कराने दिली आहे. त्याचवेळी मुस्तांगच्या कोबानमध्ये विमानाचे अवशेष सापडले. 19 आसनी या विमानात 4 भारतीय, 3 परदेशी आणि 13 नेपाळी नागरिक होते. मात्र, विमानातील प्रवासी सुरक्षित आहेत की नाही हे अद्याप समजू शकलेले नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरून धूर निघताना दिसला, त्यानंतर विमानाचा शोध घेण्यात आला. खराब हवामानामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने लष्कराला बचावकार्य कठीण जात आहे.
 
विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वतावरून वळल्यानंतर धौलागिरी पर्वताकडे वळवण्यात आले.शोध मोहिमेसाठी परिसरात हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मुस्तांगमधील कोबानजवळ विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळी लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, नेपाळी लष्कराच्या एमआय-17 हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे. मात्र, खराब हवामानामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.