शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 नोव्हेंबर 2021 (14:03 IST)

कोरोनाच्या नव्या व्हेरियंट मुळे अडचणीत येणार? इस्रायल या देशांमध्ये आणीबाणी, कडकपणा लागू करू शकतो

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या B.1.1529 या कोरोना विषाणूच्या नवीन व्हेरियंट ने जगभरात खळबळ उडवून दिली आहे. हे आतापर्यंतच्या सर्वात घातक व्हेरियंट पैकी एक म्हणून ओळखले जात आहे आणि यामुळेच जगभरात सावधगिरी बाळगली जात आहे. इस्रायलमध्येही एक प्रकरण समोर आले आहे, जो कोरोनामधून जेमतेम बरा झाला असून आता देशात आणीबाणी लागू करण्याचा विचार सुरू आहे. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी तज्ज्ञांची बैठक बोलावून आणीबाणी लागू करण्याचा इशारा दिला आहे. आम्ही आणीबाणीच्या उंबरठ्यावर आहोत, असे त्यांनी या व्हेरियंट ला सामोरे जाण्यासाठी बोलावलेल्या बैठकीत सांगितले.
दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील देशांना सतर्क राहण्यास आणि धोक्याचे मूल्यांकन करताना निर्बंधांचा विचार करण्यास सांगितले आहे. दक्षिण आफ्रिकेतील वायरोलॉजिस्ट ट्यूलिओ डी ऑलिव्हिरा म्हणाले, 'आम्ही पाहू शकतो की हा व्हेरियंट  खूप वेगाने पसरत आहे. येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत देशाच्या आरोग्य सेवा प्रणालीवर दबाव येऊ शकतो. आगामी काळात दक्षिण आफ्रिकेत नवीन प्रकरणे वाढण्याचा धोका असल्याचे स्पष्ट होत असून जगासाठी ही चिंतेची बाब आहे. त्यामुळेच अनेक देशांनी प्रवासी बंदी लादण्यास सुरुवात केली आहे.