Dharma Sangrah
✕

भारत हा प्रदूषण पसरवणारा देश- डोनाल्ड ट्रम्प

Updated: मंगळवार, 2 मे 2017 (09:00 IST)
 
या कराराअंतर्गत पैसे भरण्यासाठी अमेरिकेला वेगळ्या पद्धतीनं लक्ष्य करण्यात येत आहे. खरं तर प्रदूषण पसरवणारे रशिया, चीन आणि भारतासारखे मोठे देश काहीच योगदान देत नाहीत. ट्रम्प म्हणाले, येत्या दोन आठवड्यांत पॅरिस करारावर मोठा निर्णय घेणार आहोत. पॅरिस करार हा एकतर्फी आहे. त्यामुळे अमेरिकेला अरबो डॉलरचं नुकसान सोसावं लागतंय. मात्र प्रदूषण करणा-या रशिया, चीन आणि भारताचं यात कोणतंही योगदान नाही. जलवायू परिवर्तन डोळ्यांसमोर ठेवून 2015मध्ये संयुक्त राष्ट्राच्या पारंपरिक रूपरेषेंतर्गत 194 देशांनी करारावर स्वाक्षरी केली होती. यातील 143 देशांनी या कराराचं जोरदार समर्थनही केलं आहे.
 
जलवायू तापमान कमी करण्याचा या कराराचा मुख्य उद्देश आहे. पॅरिस कराराचं पालन करताना अमेरिकेच्या जीडीपीला येत्या 10 वर्षांत 2.5 ट्रिलियन डॉलर म्हणजेच 1606 अरब रुपयांहून जास्तीचं नुकसान सोसावं लागू शकते. त्यामुळे येत्या काळात अमेरिकेतील कारखाने आणि प्लांट्स बंद होतील, असंही ट्रम्प म्हणाले आहेत. ट्रम्प यांनी अमेरिकन मीडियाला गद्दार असं संबोधत मीडिया हा रिपोर्ट दाखवणार नसल्याचंही सांगितलं आहे.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

पुण्यातील टिंबर मार्केटमध्ये भीषण आग; ५० हून अधिक दुकाने जळून खाक

शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार, महाराष्ट्र सरकार आणि आयएचसीएल यांच्यात करार

महाराष्ट्रातून वृंदावनमध्ये आलेल्या पीडितेने कथाकार इंद्रदेव महाराज यांच्यावर २०० महिलांचे लैंगिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला

LIVE: शिर्डी विमानतळ परिसरात एक पंचतारांकित हॉटेल बांधण्यात येणार

सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी कल्याण न्यायालयाचे १८० कर्मचारी मंगळवारी अनिश्चित काळासाठी संपावर गेले

पुढील लेख
Show comments