1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
  4. Trump's state visit has reached over a million signatures

ट्रम्प यांच्या विरोधात स्वाक्षरी अभियान, 10 लाख जणांनी केल्या स्वाक्षऱ्या

ट्रम्प यांच्या विरोधात स्वाक्षरी अभियान
अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इंग्लंड दौरा रोखण्यासाठी ऑनलाईन स्वाक्षरी अभियान सुरु करण्यात आली आहे. आतापर्यत 10 लाख जणांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ट्रम्प यांनी सात देशातील मुस्लिमांवर अमेरिकेत येण्यास बंदी घातल्याच्या निषेधार्थ ही मोहिम राबवण्यात आली असल्याचं बोललं जात आहे.

लंडनसह इंग्लंडमधील कमीत कमी 10 शहरांमध्ये ट्रम्प यांच्या या नव्या धोरणाविरोधात निदर्शनं केली जाऊ शकतात, असा अंदाज लावला जात आहे. दरम्यान इंग्लंडच्या ज्या नागरिकांकडे बंदी घालण्यात आलेल्या देशाचंही नागरिकत्व आहे, त्यांना अमेरिकेत प्रवेश करता येईल, असं इंग्लंडच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. 
पुढील लेख
चिंचवडजवळ रेल्वे रुळाला तडे, वाहतुकीवर परिणाम