सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 15 जुलै 2023 (16:20 IST)

UAE: पंत प्रधान मोदींच्या स्वागतासाठी बुर्ज खलीफावर मोदींचा फोटो

फ्रान्सचा दोन दिवसांचा दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पोहोचले. अबुधाबी विमानतळावर पंतप्रधान मोदींचे स्वागत करण्यात आले. पीएम मोदींनी अबुधाबीचे क्राउन प्रिन्स शेख खालिद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी UAE चे अध्यक्ष शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची महत्वाच्या द्विपक्षीय मुद्द्यांवर भेट घेणार आहेत.

अबुधाबी येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी दुबईच्या बुर्ज खलीफा वर भारतीय तिरंगा दाखवण्यात आला नंतर बुर्ज खलीफावर पंतप्रधान मोदींचे चित्र लावण्यात आले होते. 
भारतीय पंतप्रधानांच्या स्वागतात माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत आहे (वेलकम माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी) असे लिहिले होते. 
 
कार्यक्रमादरम्यान भारतीय तिरंगाही प्रदर्शित करण्यात आला. गेल्या वर्षी भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने बुर्ज खलिफा येथे भारतीय तिरंगा फडकवण्यात आला होता. 



Edited By - Priya Dixit