शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017 (14:39 IST)

शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांना घशाचा कॅन्सर

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या पत्नी कुलसुम यांना घशाचा कॅन्सर झाल्याचे निष्पन्न झाला आहे. सध्या  त्यांच्यावर लंडन येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कुलसुम यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी तसेच त्यांना लवकर बरे वाटावे अशा शुभेच्छा देण्यासाठी पाकिस्तानचे आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा यांनी शरीफ यांच्याशी दूरध्वनीवरून बोलणे केल्याचे आर्मी प्रवक्ते मेजर जनरल आसिफ गफूर यांनी सांगितले.

गफूर म्हणाले, गेल्या वर्षी शरीफ यांनीच बाजवा यांना आर्मी चीफ पदावर नियुक्त केले होते मात्र शरीफ यांना पंतप्रधानपदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर त्यांच्यात झालेले हे पहिलेच अधिकृत संभाषण आहे. कुलसुम गेले काही दिवस आजारी होत्या व त्यांच्या तपासण्या केल्या असताना त्यांना घशाचा कॅन्सर झाल्याचे लक्षात आले आहे.

दरम्यान पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्यामुळे रिकामी झालेली लाहोरच्या शरीफ यांच्या जागेवर निवडणूक लढविण्यासाठी कुलसुम यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या उमेदवारीला इम्रानखान यांच्या पक्षाने आव्हान दिले आहे. लंडनमधील रूग्णालयातील डॉक्‍टरांच्या मते कुलसुम यांचा कॅन्सर प्राथमिक अवस्थेत लक्षात आला असल्याने त्या त्यातून बऱ्या होऊ शकतील.