आफ्रिकेत तणाव कायम
11 मे पासून नायजेरीया आणि झिम्बॉब्वेच्या नागरीकां विरोधात आफ्रिकेतील स्थानिक नागरिकांनी पुकारलेल्या आंदोलनात मृतांची संख्या वाढत असून देशातील स्थिती पाहता आफ्रिका सरकारने लष्कर तैनात करण्याचा निर्णय घेतला असून, आंदोलन कर्त्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून आफ्रिकेत हिंसाचार उफाळला आहे. यात आतापर्यंत 42 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर नायजेरीयन आणि इतर शेजारी देशातील असे सुमारे 50 लाखाहून अधिक विदेशी लोकं वास्तव्यास आहेत.
त्यांच्यामुळे स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होत नसल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. या विरोधात त्यांनी पुकारलेल्या संघर्षामुळे 25 हजार लोकांवर बेघर होण्याची वेळ आली आहे.