इंडोनेशिया भूकंपाने हादरले
गेल्या काही दिवसांपासून इंडोनेशियाला मोठ्या प्रमाणावर भूकंपाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी पहाटेही येथील मालुकू प्रांताला भूकंपाने जबरदस्त धक्का दिल्याने त्सुनामीची शक्यता निर्माण झाली होती. इंडोनेशियाच्या हवामान खात्याने ही शक्यता वर्तवली होती. आता हा धोका टळल्याचे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 6.6 एवढी नोंदली गेली.
- वेबदुनिया वर वाचा :
- मराठी ज्योतिष
- लाईफस्टाईल
- बॉलीवूड
- मराठी बातम्या
