1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
  6. उरूमकीत आज मशिदीही बंद

उरूमकीत आज मशिदीही बंद

चीनमध्ये उसळलेली धार्मिक दंगल थांबविण्यासाठी आता सरकारने कडक उपाययोजना केली आहे. नव्याने दंगल उसळू नये म्हणून आज शुक्रवारच्या सार्वजनिक नमाजाच्या मुहूर्तावर मशिदी बंद ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

उईगर मुस्लिमांना घरात थांबूनच नमाज पठण करण्यास सांगितले आहे. बाहेर रस्त्यावर चीनी सशस्त्र सैनिक रस्तोरस्ती फिरत आहेत. झिनजियांग प्रांताच्या वायव्य भागाची राजधानी असलेले हे शहर दंगलींनी हादरले आहे. गेल्या पाच दिवसांत येथील दंगलीत १५६ लोक मृत्युमुखी पडले आहेत.