1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

एचआयव्ही रुग्णांना दिलासा....

वयस्क एचआयव्ही रुग्णांमधील प्रतिकारक्षमता वाढवण्याची पद्धत शोधून काढण्यात शास्त्रज्ञांना अखेर यश मिळाले आहे. या अंतर्गत प्रतिकारशक्ती वाढवणार्‍या टी पेशींमध्ये वाढ करणे सहज शक्य असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे.

एचआयव्ही मुळे शरीरातील टी पेशींची संख्या झपाट्याने घटते, यामुळे त्या रुग्णाची प्रतिकार शक्तीही झपाट्याने कमी होते. या टी पेशींची निर्मिती थाइमस ग्रंतींपासून होते, वयस्कांमध्ये या ग्रंथीचे प्रमाण कमी असल्याने त्यांच्यातील टी पेशींची संख्याही कमी असते. आता हीच संख्या वाढवण्यात यश आल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.