- वृत्त-जगत
» - मराठी बातम्या
» - आंतरराष्ट्रीय
कॅनडात आग, 17 हजार बेघर
कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया राज्यातील केलोना भागातील एका जंगलात आग लागली असून या आगीमुळे सुमारे 17,000 लोकांना घर सोडून विस्थापित व्हावे लागले आहे. जंगलातील या आगीत 300 हेक्टर जमीन आधीच खाक झाली आहे. अग्निशमन कर्मचा-यांनी दिलेल्या माहितीनुसार किमान नऊ घरे आगीत खाक झाले आहेत. तर 6,500 घरे लोक सोडून गेले आहे. आगीत कुणी होरपळल्याचे वृत्त अद्याप समोर आलेले नाही.