1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

गेलेली स्मृती आता परत येणार.?

कैक वर्षांपूर्वीची एखादी घटना तुम्हाला आठवत नसेल, ओळखल का मी कोण? असा प्रश्न तुम्हाला कोणी विचारला किंवा स्मृतीभ्रंशाचा रोग तुम्हाला झाला असेल तर हे सारं 'विसरून' जा. हा रोग आता पूर्ण बरा होऊ शकतो.

लंडनमधील काही शास्त्रज्ञांनी गेलेली स्मृती परत मिळवण्यात यश संपादन केले आहे. एका प्रयोगादरम्यान हे यश अचानक पुढ्यात आले. झाले असे,एका जाड व्यक्तीची अतिखाण्याची सवय मोडण्यासाठी वैज्ञानिकांनी त्याच्या डोक्यावर इलेक्ट्रोड लावले आणि त्याच्यात विद्युत प्रवाह सोडला. वास्तविक हायपोथेलेमस नावाचा एक बिंदू वैज्ञानिकांना शोधायचा होता.

पण अचानक या व्यक्तीला 30 वर्षांपूर्वी आपल्या मित्रासोबतचे संभाषण आठवू लागले आणि अचानक शास्त्रज्ञांना या व्यक्तीच्या मेंदूतील स्मृती जागृत करण्यार्‍या काही पेशींमध्ये बदल झाले असून, तो आपल्या पुर्वायुष्यात विसरलेलया सर्व घटना आठवू शकतो, हे लक्षात आले.

अल्झायमरसारख्या रोगात या पद्धतीचा उपपयोग करण्याविषयी वैज्ञानिकांनी विचार सुरू केला आहे.