1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

तेहरानमधील स्फोटात 9 ठार

इराणच्या दक्षिणेस असलेल्या शिराज शहरात काल रात्री उशीरा मशीदीत झालेल्या स्फोटात नऊ ठार तर शंभराहून अधीकजण जखमी झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शहरातील शोहादा मशीदीत हा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की अनेकांचा जागीच मृत्यू झाला. जखमीतील अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांची संख्या वाढण्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.