दुबईत 45 भारतीयांना अटक
कमी वेतन मिळत असल्याने या विरोधात आंदोलनाचा पावित्रा घेतलेल्या दुबईतील 45 भारतीयांना अटक करत त्यांना सहा महिन्याच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. दुबईतील न्यायालयाने हा निर्णय दिला. या भारतीयांवर सामाजिक सौदार्ह खराब करणे तसेच संपत्तीचे नुकसान करण्याचे आरोप लावण्यात आले आहेत. मिसदेमिनोर येथील न्यायालयाने गेल्या आठवड्यात हा निर्णय दिला.

