पंतप्रधानपदी माओवादी की कोईराला?
माओवाद्यांनी नवीन सरकारच्या नेतृत्वाबाबत अगोदरच घोषणा केल्यानंतरही पंतप्रधान गिरीजाप्रसाद कोईराला यांनी नवीन सरकार सर्वसंमतीनेच स्थापन करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे.
सहाशे एक सदस्यांच्या संविधान सभेत कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत न मिळाल्याने नवीन सरकारचे नेतृत्व आपण करणार का, या प्रश्नावर सर्वकाही सर्वसंमीनेच होईल, असे सूचक विधान केले. दहा एप्रिलला झालेल्या ऐतिहासिक निवडणुकी माजोवाद्यांनी दोनशे वीस जागा पटकवून सर्वात मोठा होण्याचा मान पटकावला आहे.
नेपाळी कॉंग्रेसला एकशे दहा, सीपीएन-यूएमऐलला एकशे तीन जागा पटकवण्यात यश आले. काठमांडूत दहापैकी नेपाळी कॉंग्रेसने सहा तर माओवाद्यांना चार जागा मिळाल्या. माओवाद्यांचे नेते प्रचंडही येथूनच निवडून आले आहेत.
माओवाद्यांनी भावी सरकारचे नेतृत्व आम्हीच करणार अशी घोषणा केल्यानंतर कोईरालांचे हे विधान आले आहे. कायदेतज्ज्ञांच्या मते सर्वात मोठा पक्षच सरकारचे नेतृत्व करेल याबाबत तरतूद नसल्याचे स्पष्ट केले आहे.