मंगळवार, 6 जानेवारी 2026
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By भाषा|
Last Modified: सिडनी , बुधवार, 28 मे 2008 (19:03 IST)

फाशीनंतर क्षमा...!

फाशीनंतर क्षमा...!
ऑस्ट्रेलियात एका व्यक्तीने बलात्कार करून त्या मुलीच्या हत्येप्रकरणी त्याला फाशीवर लटकाविण्यात आले होते. त्यानंतर तब्बल 86 वर्षांनी त्याला गव्हर्नरने क्षमादान दिले आहे.

त्या व्यक्तीचे नाव कोलीन कॅम्पबेल रास असे असून त्याला 1922 मध्ये वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी फाशी देण्‍यात आली होती. परंतु, आज व्हिक्टोरिया राज्याचे गव्हर्नर डेविड डे क्रेस्टर यांनी त्याला माफ केले.

रासला माफ करण्याची याचिका केविन मोर्गन यांनी दाखल केली होती. मोर्गनने दाखल केलेल्या याचिकेनुसार रासच्या घोंगडीवर मिळालेल्या मुलीच्या केसांच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर ते मुलीच्या केसाशी जुळत नव्हते.