1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

ब्रम्होसची मागणी वाढली

युद्ध नौकेवरून जमिनीवर मारा करणार्‍या भारत आणि रशिया यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या ब्रम्होस या क्षेपणास्त्राची मागणी सध्या वाढली आहे.

अनेक देशांनी ब्रम्होस विकत घेण्याची तयारी दाखवली असून, ब्रम्होसची विक्री करायची अथवा नाही, किंवा कोणत्या देशाला ब्रम्होस द्यायचे याचा निर्णय भारत आणि रशिया या उभय देशांना घ्यायचा आहे.

संरक्षण मंत्री ए के एंटोनी यांनी लोकसभेत ही माहिती दिली. पर्यावरणाला कोणतेही नुकसान न होऊ देता या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी करण्यात आल्याने आणि शत्रूच्या तळांवर अचूक मारा करण्याची क्षमता असल्याने या क्षेपणास्त्र विषयी अनेक देशांची उत्सुकता वाढली आहे.

हे क्षेपणास्त्र निर्यात करायचे का नाही याचा निर्णय भारत आणि रशिया घेतील असेही त्यांनी स्पष्ट केले.