ब्राऊन दलाई लामांना भेटणार
इंग्लंडचे प्रधानमंत्री गार्डन ब्राउन तिबेट प्रकरणावरून तिबेटचे अध्यात्मीक नेते दलाई लामा यांची भेट घेणार आहेत.तिबेट प्रकरण अत्यंत संवेदनशील बनले असून, लामांच्या इंग्लंड दौर्या दरम्यान आपण त्यांची भेट घेऊन या प्रश्नावर चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले. तिबेटच्या स्वातंत्र्यावरून सध्या तिथे मोठे दंगे उसळले आहेत, या दंग्यांना चीन सरकारच जबाबदार असल्याचा आरोप चीनने केला आहे.

