1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

ब्रिटनीची गाडी रुळावर

मानसिक रोगातून ब्रिटनीला आता काहीसा दिलासा मिळत आहे. तिने आपल्या मुलांचा ताबा मिळवल्यानंतर आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याचा निर्णय घेतला असून, तिची गाडी पुन्हा रुळावर येत असल्याचे तीच्या निकटवर्तियांनी स्पष्ट केले आहे.

'हाऊ आय मेट यूअर मदर'मध्ये पाहुणी कलाकार असलेली ब्रिटनी आता याच कार्यक्रमातील दुसर्‍या भागात एका रिसेप्शनिस्टचे काम करणार आहे.

'पीपल' या मासिकाने हे वृत्त प्रकाशित केले आहे. ब्रिटनीच्या या कार्यक्रमातील सहभागाने या कार्यक्रमाची लोकप्रियता वाढली असल्याचे निर्मात्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.