मुलांसमोर धूम्रपान कराल तर खबरदार
आज काल सार्वजनिक ठिकाणी आणि घरी देखील मुलांसमोर सर्रास धूम्रपान केले जाते. या वृत्तीवर संशोधकांनी आक्षेप घेत अशा शौकिनांना धोक्याचा इशारा दिला असून, जर लहान वयात मुलांसमोर तुम्ही धूम्रपान कराल, तर त्यांना अनेक संसर्गजन्य रोग होण्याची भिती अधिक असल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे.
हॉंगकॉंग विद्यापीठाच्या संशोधकांनी नुकतेच एक सर्वेक्षण केले असून, यानंतर त्यांच्या निदर्शनास ही बाब आली. मुलांच्या पुढ्यात धूम्रपान केल्यानंतर त्यांची रोग प्रतिकारक शक्ती नष्ट होण्याची शक्यता असल्याने त्यांना अनेक रोग उद्भवू शकतात असे संशोधकांचे म्हणणे आहे.
या मुलांमध्ये अनेक दोष आढळून आले असून, वजन कमी आसने, चिडचिड करणे, आणि त्यांच्यात श्वसनाचे रोग असल्याचे संशोधकांना आढळून आले.