1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लंडनमधील शिक्षक संपावर

इंग्लंड सरकारने जानेवारीमध्ये जाहीर केलेल्या वेतन कराराने नाराज झालेल्या देशभरातील सुमारे दोन हजार शिक्षकांनी आज संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडच्या इतिहासात 20 वर्षांनंतर अशा प्रकारे सर्व शिक्षक संपावर जात आहेत. आमच्या संयमाचा सरकार अंत पाहता असल्याने आम्हाला संपावर जाण्याचा निर्णय घेणे

भाग पडल्याचे मत शिक्षक संघटनेचे सरचिटणीस क्रिस्टनी ब्लोअर यांनी व्यक्त केले. सरकारने शिक्षकांचा विश्वासघात केल्याचेही ते म्हणाले.
शिक्षकांनी अशा स्वरूपाचा संप पुकारणे चुकीचे असल्याचे मत इंग्लंडचे पंतप्रधान गार्डन ब्राऊन यांनी व्यक्त केले आहे.