1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय

लादेन पुन्हा सक्रिय..?

चोवीस तासांमध्ये अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या लादेनने सलग दुसरा आपल्या आवाजाचा टेप अल जजिरा वाहिनीवर दाखवल्याने अमेरिकेचे धाबे दणाणले आहेत.

यापूर्वी लादेनने दिलेल्या पहिल्या टेपमध्ये इस्लाम विरोधकांना इशारा दिला होता. यानंतर आता लादेनने आपल्या दुसर्‍या टेपमध्ये फिलिस्तीन समस्याही शांततेने नाही तर हिंसक आंदोलनाने हा प्रश्न सोडवण्याचे आवाहन त्याने आपल्या समर्थकांना केले आहे.

पहिला टेप लादेनचाच असल्याचे अमेरिकेच्या गुप्तहेर संस्था सीआयए ने कबूल केले होते. दुसर्‍या टेप विषयाची माहिती आपल्याकडे नसल्याचे सीआयएच्या अधीकार्‍यांनी स्पष्ट केले आहे.
About Writer
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा