श्रीलंकेत 40 बंडखोर ठार
श्रीलंकेच्या उत्तर पश्चिमी भागात लिट्टेचे बंडखोर आणि श्रीलंकन सैनिकांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत 40 बंडखोर आणि 6 सैनिक ठार झाले.
श्रीलंकन सैन्याच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहिती नुसार मन्नार, वावुनिया, जाफना शहरात झालेल्या विविध चकमकीत बंडखोरांना मारण्यात सैन्याला यश आले. श्रीलंकेच्या उत्तर भागात बंडखोरांचे प्रस्थ वाढले असून, त्यांच्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी श्रीलंकन सैन्याने अभियान सुरू केले आहे.