श्रीलंकेत 46 बंडखोर ठार
श्रीलंकेच्या उत्तरी जाफना भागात सैनिक आणि लिट्टेच्या बंडखोरांमध्ये झालेल्या चकमकीत 46 बंडखोर ठार झाले.श्रीलंकेच्या संरक्षण विभागाने या वृत्ताला दुजोरा दिला असून, यात 13 श्रीलंकन सैनिकही मारले गेल्याचे सैन्य विभागाने मान्य केले आहे.गेल्या काही महिन्यांपासून श्रीलंकन सैन्य आणि बंडखोरांमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे.

