संगणक साधणार मानवी मेंदूशी बरोबरी
माणसाने निर्माण केलेला संगणक पुढे जाऊन माणसालाच पर्याय ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसे संकेतही मिळत आहेत. आगामी काही वर्षांत बुद्धिमत्तेच्या बाबतीत संगणक माणसाशी बरोबरी करेल, असे एका अभ्यासात पुढे आले आहे.
ही वेळ फार दूर नाही. २०२० पर्यंतच हे शक्य आहे. कोणतीही कठीणांत कठीण समस्या संगणक दूर करू शकेल. अमेरिकन संगणक गुरू रे कुर्जवईल यांच्या हवाल्याने इंडिपेंडंट या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तात हे म्हटले आहे. मानवी मेंदू ज्या पद्धतीने काम करतो, अगदी तसेच काम संगणक २०२० पर्यंत करेल, असे कुर्जवईल यांनी म्हटले आहे. संगणकाची क्षमता या शतकाच खूपच वाढेल, असेही ते म्हणाले.