शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. आंतरराष्ट्रीय
Written By वार्ता|

होय, आमच्याकडे दहशतवादी आहेत- पाक

आपल्या देशात दहशतवादी व गुन्हेगारांनी आसरा घेतल्याचे पाकिस्तानने मान्य केले असून त्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी यावर सहमती दर्शवली आहे.

भारताच्या सूरात सूर मिसळून दहशतवादाचा विरोध केला असून दहशतवाद्यांविरोधी कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे.

उभय देशांत झालेल्या गृहसचिव स्तरावरील चर्चेत हे सांगण्यात आले.

याबरोबरच दोन्ही देशांनी परस्परांवरील विश्वास वाढवण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलत उभय देशांतील कारागृहात बंदी असलेल्या परस्परांच्या कैद्यांची सुटका करण्याचा व व्हिसा नियमांमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.