आपण आधी एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तर येथील वेतन सांगण्याच्या बाबतीत प्रामाणिकपणा दाखवायला हवा. नव्या कंपनीत जास्त वेतन मिळालं पाहिजे म्हणून आधीच्या नोकरीत जास्त वेतन होतं असं सांगू नये. याचं कारण आपल्याला सॅलरी स्लीप जमा करण्यास सांगितलं जाऊ शकतं. त्यासप्रमाणे आपण ज्या ठिकाणी नोकरी करत होतात त्या संस्थेमध्ये आपल्या वेतनाबाबतची पडताळणी होऊ शकते. नवीन नोकरी स्वीकारताना आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणी आणि तणावांच्या बाबतीत बोलू नये. इंटरव्ह्यूच्या वेळी आपल्या घरगुती अडचणी आणि आर्थिक स्थिती याबाबतही बोलणं टाळावं. त्याचप्रमाणे आपल्या सर्व गोष्टी पैशांच्या बाबतीत केंद्रीत असता काम नयेत. त्याऐवजी आपल्या नोकरीवर ठेवल्यास ते त्या कंपनीसाठी कसं फायदेशीर ठरेल हे सांगणच्या प्रयत्न करावा. आपला अनुभव आपल्या बाबतीत सर्व काही सांगणारा असतो. वेतनाच्या बाबतीत बोलताना आपल्याला देण्यात आलेल्या कामाविषयीही रूची दाखवावी. जेव्हा आपण बोलत असतो त्यावेळी आपल्या देहबोलीचा (बॉडी लँग्वेज) अंदाजही असायला हवा.