म्हणून सुनील सलामीला - गंभीर
कोलकाता नाईट रायडर्सचा कॅरिबियन गोलंदाज सुनील नारायण ईडनवर किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्धच्या सामन्यात सलामीला फलंदाजीसाठी उतरला. तेव्हा अनेकांनी भुवया उंचावल्या. पण नारायणने 18 चेंडूत 4 चौकार आणि तीन षटकारांसह 37 धावा फटकावल्या आणि गौतम गंभीरसह सलामीला 76 धावांची भागीदारी रचून कोलकात्याच्य विजयाचा पाया घातला. सुनील नारायणच्या गोलंदाजीतल्या कौशल्याबद्दल सर्वांनाच ठावूक आहे, पण तो उत्तम फटकेबाजीही करू शकतो, असे गंभीरने नमूद केले. कोलकात्याची फलंदाजांची फळी अगदी भक्कम आहे. त्यामुळे सुनीलला एरवी नवव्या क्रमांकावर फलंदाजीची फारशी संधी मिळत नाही.