शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

IPL 10: दुखापतींमुळे दिग्गज खेळाडूंची आयपीएलमधून माघार

भारताचा आघाडीचा ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन (रायझिंग पुणे सुपरजायंट्स) हर्नियामुळे आजारी असल्यामुळे आयपीएलच्या दहाव्या हंगामात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याचप्रमाणे भारताचे कसोटी सलामीवीर लोकेश राहुल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू) आणि मुरली विजय (किंग्ज इलेव्हन पंजाब) खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असून, तेसुद्धा संपूर्ण स्पध्रेला मुकणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
 
याशिवाय भारताचा कर्णधार विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू), रवींद्र जडेजा (गुजरात लायन्स) आणि वेगवान गोलंदाज उमेश यादव (कोलकाता नाइट रायडर्स) सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये खेळू शकणार नाहीत.