शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: मंगळवार, 4 एप्रिल 2017 (14:33 IST)

स्टीव्हन स्मिथने परिधान केला पुणेरी पेहराव!

आयपीएलच्या यंदाच्या मोसमासाठी रायझिंग पुणे सुपरजायंट्सच्या नेतृत्वाची धुरा स्मिथच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.
 
त्यामुळं रायझिंग पुणेच्या प्रमोशनसाठी स्मिथनं बाराबंदी, धोतर, कमरेला शेला, गळ्याभोवती उपरणं आणि डोक्यावर पुणेरी पगडी असा पारंपरिक वेष परिधान केला होता.
 
अजिंक्य रहाणेसोबतचा हा फोटो स्वत: स्मिथनंच इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. पण प्रमोशनच्या व्हिडिओत स्मिथ कसा वावरला आहे, हे पाहण्यासाठी तुमच्याइतकेच आम्हीही उत्सुक आहोत.