गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: मुंबई , बुधवार, 19 एप्रिल 2017 (10:44 IST)

विराटचे वॉटसन विषयी धक्कादायक वक्तव्य

आयपीएल सत्र दहाव्या पर्वात पूर्व माजी उपविजेता आरसीबीचा संघ आता गुणतालिकेत सर्वात खालच्या तळाला पोहोचला आहे. पुणे विरुद्धच्या लढतीत विजयाची संधी होती, पण खराब बॅटिंगमुळे आम्हाला पराभवाचा सामना करावा लागला, असे विराट म्हणाला. सामन्यानंतर विराटने वॉटसनविषयी धक्कादायक वक्तव्य केले आहे.

वॉटसनला आम्ही 9 कोटींना घेतले पण तो 2 कोटींचे काम देखील करत नसल्याचे विराटने वक्तव्य केले आहे. संघाला वॉटसनकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती पण तो लवकर आऊट झाला. यावर्षी वॉटसनची बॅटिंग स्ट्राइक रेट 10.78 होती तर बॉलिंग इकॉनमी 11.66 रन प्रती ओव्हर आहे. कोहलीच्या या वक्तव्यामुळे आता असे म्हटले जात आहे की, यामुळे वाद होऊ शकतो आणि वॉटसनला टीममधून बाहेर केले जाऊ शकते.