IPL 10 : बेन स्टोक्सचे रायजिंग पुणे सुपरजाइंट्स मध्ये झाले स्वागत
पहिल्यांदाच IPL खेळायला भारतात आलेला इंग्लिश ऑलराउंडर बेन स्टोक्स आपली टीम रायजिंग पुणे सुपरजाइंट्सशी ज्वाईन झाला आहे.
येथे झालेल्या एका इव्हेंटमध्ये त्याला पुण्याचे मालक संजीव गोयंकाने टीमची जर्सी भेट दिली.
यावेळी टीमचा नवा कर्णधार स्टीव स्मिथ आणि इंडियन क्रिकेटर अजिंक्य रहाणे उपस्थित होता. या संपूर्ण इव्हेंटमध्ये एमएस धोनी दिसला नाही. आपल्याला माहित असेलच की, ऑक्शनमध्ये स्टोक्सला पुणे टीमने 14.5 कोटी रूपयांना खरेदी केले.
मागील हंगामात कर्णधार राहिलेल्या धोनीला या इव्हेंटला असायला हवे होते का? असे गोयंकाना छेडले असता ते म्हणाले, 6 एप्रिलला आमचा पहिला सामना होत असून माही 3 एप्रिलला टीमसोबत असेल. आम्ही टीमच्या प्रत्येकर रणनितीत धोनीला सामावून घेऊ. मी सांगू इच्छितो की, टीम सिलेक्शनमध्ये माहीचे संपूर्ण योगदान राहील.