गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By
Last Modified: पुणे , मंगळवार, 16 मे 2017 (12:06 IST)

स्मिथला आले टेन्शन !

रायजिंग पुणे सुपरजायंटने किंग्ज इलेव्हन पंजाबला पराभवाची धूळ चारत प्लेऑफमधील स्थान निश्चित केले. या विजयानंतर पुण्याचा संघ आनंदात असला तरी कर्णधार स्टीव्हन स्मिथला एक चिंता सतावतेय. त्याच्या चिंतेचे कारण म्हणजे बेन स्टोक्सची बाद फेरीतील अनुप‍स्थिती. स्टोक्स हा आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू आहे. या सामन्यानंतर तो मायदेशी रवाना होणार आहे. त्यामुळे मुंबईविरुद्धच्या बाद फेरीतील सामन्यात तो नसणार आहे. स्टोक्सने 12 सामन्यात 316 धावा केल्यात. त्यापैकी 103 धावांची नाबाद खेळी ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. त्यासोबतच त्याने 12 विकेटही घेतल्या.