रविवार, 29 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2017
Written By

IPL 10: वीरू आणि सनी लिओनीसोबत कॉमेंट्री करणार

टीम इंडियाचा माजी धडाकेबाज फलंदाज वीरेंद्र सेहवाग एकेकाळची पॉर्नस्टार आणि बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी हिच्यासोबत कॉमेंट्री करणार आहे. सोमवारी होणा-या दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि हैदराबाद सनरायझर्स यांच्यातील सामन्या दरम्यान वीरेंद्र सेहवाग आणि सनी लिओनी कॉमेंट्री करताना दिसणार आहेत.

सनी लिओनीने ट्विट करुन विचारले की, मी एका दिग्गज क्रिकेटपटूच्या शोधात आहे. जो माझ्यासोबत 2 मे रोजी होणा-या सामन्याच्यावेळी कॉमेंट्री करु शकेल. यावर लगेचच वीरेंद्र सेहवागने रिप्लाय देत ट्विट केले की, सनीसोबत कॉमेंट्री करणे म्हणजे खूप मजेशीर होईल. मी यासाठी तयार आहे. तुम्ही सुद्धा तयार व्हा, मोठा धमाका होईल, काय?....दरम्यान, वीरेंद्र सेहवागच्या या ट्विटनंतर सनीने त्याच्यासोबत कॉमेंट्री करण्यास तयार असल्याचे सांगितले.