चेन्नई सुपर किंग्जच्या विजयामुळे धोनीनं रचला इतिहास

Last Modified रविवार, 20 सप्टेंबर 2020 (12:30 IST)
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा आयपीएल हंगाम दुबईत सुरु झाला. पहिल्याच सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबईला 5 गडी राखून पराभूत केलं. चेन्नईला 2018 पासून आतापर्यंत सलग पाचवेळा मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. मुंबईविरुद्धच्या या पराभवाची मालिका खंडीत करत चेन्नई सुपरकिंग्जने विजयी सलामी दिली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना सौरभ तिवारीच्या खेळीच्या जोरावर चेन्नईसमोर 163 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अंबाती रायडु आणि फाफ डुप्लेसी यांच्या अर्धशतकांच्या जोरावर चेन्नईने हे आव्हान सहज पूर्ण केलं. या विजयासह चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली.
चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करताना धोनीचा कर्णधार म्हणून हा 100 वा विजय आहे. एखाद्या संघाचे नेतृत्व करताना अशी कामगिरी करणारा धोनी हा आयपीएलच्या इतिहासातला पहिलाच कर्णधार ठरला आहे. धोनीनं आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून आतापर्यंत 105 विजय मिळवले आहेत. त्यातले 5 विजय हे पुणे वॉरिअर्सकडून खेळताना मिळवले होते.

दरम्यान, सामना जिंकणाऱ्या चेन्नईची 2 बाद 6 अशी अवस्था झाली होती. त्यानंतर मुंबईने पकड घट्ट करण्याऐवजी केलेली ढिलाई चेन्नईच्या पथ्यावर पडली. रायडू आणि डुप्सेसी यांनी या संधीचा फायदा घेत शतकी भागीदारी केली. मुंबईचा हुकमी वेगवान गोलंदाज बुमराह निष्प्रभ ठरला.
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी मिळालेल्या मुंबईची सुरूवात जोरदार होती. रोहित शर्माने पहिल्याच चेंडूवर चौकार मारुन आव्हानात्मक परिस्थितीत सुरू झालेल्या या आयपीएलमध्ये जान फुंकली पण लेगस्पिनरसमोर नेहमीच अडखळणाऱ्या रोहितला आज पियूष चावला या चैन्नईच्या लेगस्पिनरने बाद केले. दुसरा सलामीवर डिकॉकला मात्र चांगला सुर सापडला होता, पण तोही आशा निर्माण करुन बाद झाला.
बिनबाद 46 आणि 2 बाद 48 अशी अवस्था झालेल्या मुंबईचा डाव सूर्यकुमार यादव अणि सौरभ तिवारी यांना सांभळला मात्र "सूर्य'ही मावळला. हार्दिक पंड्याने जडेजाला दोन षटकार मारुन रंग भरले परंतु जडेजाच्याच चेंडूवर डुप्लेसीने पंड्या व तिवारी यांचे सीमारेषेवर दोन अप्रतिम झेल पकडून मुंबई संघाच्या "सीमा' रोखल्या.यावर अधिक वाचा :

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...

CSKच्या चाहत्यांनी धोनीला लिहिलं पत्र, कारण जाणून घ्या...
आयपीएलमध्ये (IPL 2020) चेन्नई विरुद्ध कोलकाता यांच्याच झालेला सामना CSKने 10 धावांनी ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ...

चिंता नको, आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून
तांत्रिक अडचणींमुळे आयडॉलच्या न होऊ शकलेल्या पुढील सर्व परीक्षा १९ ॲाक्टोबर २०२० पासून ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम ...

हवाई दल दिनाच्या दिवशी मोदींनी देशातील शूर योद्ध्यांना सलाम केला
नवी दिल्ली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशाच्या शौर्य योद्धांना 88व्या भारतीय ...

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या

सीबीआयचे माजी संचालक अश्विनी कुमार यांची आत्महत्या
सीबीआयचे माजी संचालक व नागालँडचे माजी राज्यपाल अश्विनी कुमार (६९) यांचा मृतदेह सिमला ...

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल

भाजप नेत्याविरुद्ध सुनेने केला विनयभंगाचा गुन्हा दाखल
दौंडमधील भाजपचे नेते तानाजी संभाजी दिवेकर यांना विनयभंगाच्या प्रकरणात अटक करण्यात आली ...

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड

IPL 2020 : बुमराहचा नवीन रेकॉर्ड
बँगलोर (RCB)विरुद्धच्या सामन्यात मुंबई (Mumbai Indians)चा फास्ट बॉलर जसप्रीत बुमराह ...

कोणाला मिळेल प्ले ऑफचे तिकीट?

कोणाला मिळेल प्ले ऑफचे तिकीट?
मुंबई-बंगळुरूमध्ये आज चुरशीची लढत

पराभव झाल्यास हैदराबादचे होईल स्वप्नभंग

पराभव झाल्यास हैदराबादचे होईल स्वप्नभंग
आज दिल्लीशी सामना

टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा

टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी घोषणा
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेसाठी बीसीसीआयने BCCI टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताचा ...

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार

प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी आज हैदराबाद-पंजाब भिडणार
सलग तीन विजयांनी पुन्हा एकदा विजयीपथावर परतलेल्या पंजाबचा संघ व मागील सामन्यात मोठा विजय ...