सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 2 एप्रिल 2022 (21:28 IST)

IPL 2022, DC vs GT: शुभमन गिलची शानदार खेळी, दिल्लीला 172 धावांचे लक्ष्य

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील 10 वा सामना गुजरात टायटन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात पुण्यातील एमसीए स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात दिल्लीचा कर्णधार ऋषभ पंतने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्या गुजरातचे कर्णधारपद सांभाळत आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने निर्धारित 20 षटकांत 6 गड्यांच्या मोबदल्यात 171 धावा केल्या.
 
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरातची सुरुवात खराब झाली. या मोसमातील पहिला सामना खेळणाऱ्या मुस्तफिझूर रहमानने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेडला (1) यष्टिरक्षक पंतकडे झेलबाद केले. यानंतर विजय शंकरलाही विशेष काही करता आले नाही. 20 चेंडूत 13 धावांची संथ खेळी खेळल्यानंतर तो बाद झाला. शंकर आणि शुभमनमध्ये 35 चेंडूत 42 धावांची भागीदारी झाली. यानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने शुभमन गिलसह डावाची धुरा सांभाळली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 47 चेंडूत 65 धावांची भागीदारी केली.