1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शुक्रवार, 6 मे 2022 (11:55 IST)

IPL 2022: हैदराबादचा पराभव करून दिल्ली पाचव्या स्थानावर पोहोचली

आयपीएल 2022 च्या 50 व्या सामन्यात दिल्लीच्या संघाने दणदणीत विजय नोंदवून प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या त्यांच्या आशा जिवंत ठेवल्या. दिल्ली आता गुणतालिकेत पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. तर, हैदराबादचा संघ पराभवासह सहाव्या स्थानावर घसरला आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सच्या डेव्हिड वॉर्नरने 92 धावांची नाबाद खेळी खेळली आणि आपल्या संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले. या हंगामात त्याने चौथ्यांदा 50 चा टप्पा पार केला. यासह डेव्हिड वॉर्नर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत सामील झाला आहे. त्याचवेळी एक विकेट घेणारा कुलदीप यादव पर्पल कॅपच्या शर्यतीत युझवेंद्र चहलच्या जवळ आला आहे.
 
गुजरात संघ 16 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दुसरीकडे, लखनौ सुपर जायंट्सचे 14 गुण आहेत आणि ते दुसऱ्या स्थानावर आहेत. राजस्थान आणि बंगळुरू संघ प्रत्येकी 12 गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर आहेत. दिल्लीचा संघ पाचव्या आणि सनरायझर्स हैदराबाद सहाव्या आणि पंजाबचा संघ सातव्या स्थानावर आहे. तिन्ही संघांचे 10-10 गुण आहेत. कोलकाता आठ गुणांसह आठव्या क्रमांकावर आहे. चेन्नई आणि मुंबई अजूनही नवव्या आणि दहाव्या क्रमांकावर असून दोघांच्याही प्लेऑफमध्ये पोहोचण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
 
राजस्थानचा सलामीवीर जोस बटलर ऑरेंज कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. त्याने 10 सामन्यात 588 धावा केल्या आहेत.तर लखनौचा कर्णधार केएल राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे.  
 
राजस्थानचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल सर्वाधिक बळींच्या बाबतीत अव्वल तर कुलदीप यादव दुसऱ्या स्थानावर आहे.