बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: बुधवार, 18 मे 2022 (23:35 IST)

KKR VS LSG 2022: लखनौने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा 2 धावांनी पराभव केला

lucknow- kolkatta
KKR vs LSG ipl 2022- लखनौने रोमहर्षक सामन्यात कोलकात्याचा 2 धावांनी पराभव केलाDY पाटील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना लखनौने 19 षटकांत एकही विकेट न गमावता 210 धावा केल्या. प्रत्युत्तरात कोलकाता नाईट रायडर्सला 20 षटकांत 7 गडी गमावून 208 धावाच करता आल्या. संघाला 2 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. 
 
डी कॉकने आयपीएलमधील आपले दुसरे शतक झळकावले. या सामन्यात डी कॉक 70 चेंडूत 140 धावा करत नाबाद राहिला. कर्णधार केएल राहुलने 51 चेंडूत 61 धावा केल्या. डी कॉकने आपल्या खेळीत 10 चौकार आणि 10 षटकार मारले, तर कर्णधार केएल राहुलने 4 षटकार आणि 3 षटकार ठोकले.