रविवार, 28 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Modified: शनिवार, 16 एप्रिल 2022 (18:02 IST)

MI vs LSG:KL राहुलने शतकासह इतिहास रचला, 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज ठरला

लखनौ सुपर जायंट्सचा कर्णधार लोकेश राहुलने आपल्या 100व्या आयपीएल सामन्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या लखनौ सुपर जायंट्सच्या संघाने चांगली सुरुवात करत मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. संघाचा कर्णधार लोकेश राहुलने सर्वोत्तम खेळी खेळत 56 चेंडूत आयपीएल कारकिर्दीतील तिसरे शतक झळकावले आणि या हंगामतील पहिले शतक झळकावले. 
 
राहुलने आयपीएलमधील 100 वा सामना संस्मरणीय बनवला. 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा राहुल हा पहिला फलंदाज आहे. त्याने आयपीएलच्या 15 व्या मोसमातील दुसरे शतक झळकावले. त्याच्या आधी जोस बटलरनेही मुंबई इंडियन्सविरुद्ध शतक झळकावले होते.
 
या हंगामात शतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. याआधी राजस्थान रॉयल्सच्या जोस बटलरने शतक झळकावले होते. राहुलने मिल्सच्या षटकातील 5व्या चेंडूवर ऑफ साइडमध्ये चौकार मारून आयपीएल 2022 मध्ये पहिले शतक झळकावले. त्याचे हे आयपीएल कारकिर्दीतील तिसरे आणि मुंबई इंडियन्सविरुद्धचे दुसरे शतक आहे.
 
कर्णधार म्हणून केएल राहुलचे हे दुसरे शतक आहे. कर्णधार म्हणून सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. आता मात्र तो फलंदाज म्हणून खेळत आहे. केएल राहुलने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 5 षटकार लावले. 
 
या शतकासह राहुल 100 व्या सामन्यात शतक झळकावणारा पहिला खेळाडू ठरला आहे. याआधी 100व्या सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम फाफ डू प्लेसिसच्या नावावर होता. ज्याने कोलकाताविरुद्ध 86 धावा केल्या होत्या. कर्णधार केएल राहुलने आपल्या 100व्या सामन्यात नाबाद 103 धावांची खेळी करत हा विक्रम केला.