गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2022
Written By
Last Updated : गुरूवार, 10 फेब्रुवारी 2022 (09:31 IST)

IPL 2022 मेगा लिलावासाठी 5 सर्वात जुने खेळाडूंची निवड

IPL 2022 मेगा लिलावासाठी ज्यांची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत अशा 590 खेळाडूंपैकी पाच सर्वात वयस्कर खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. 
 
दक्षिण आफ्रिकेचा लेग-स्पिनर इम्रान ताहिर, हे सध्या 42 वर्षांचे आहे, हा इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाच्या मेगा लिलावासाठी निवडण्यात आलेल्या जवळपास 600 क्रिकेटपटूंमध्ये सर्वात वयस्कर खेळाडू आहे. एवढेच नाही तर आयपीएलच्या कोणत्याही संघाने त्याला विकत घेतले तर आयपीएल 2022 सुरू होण्यापूर्वी ते  43 वर्षांचे असतील. त्यांचा जन्म 27 मार्च 1979 रोजी झाला. ते  दिल्ली डेअरडेव्हिल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून आयपीएल खेळले आहे. 
 
वयोवृद्ध खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडिजच्या फिडेल एडवर्ड्सचे नाव आहे, जे सध्या 40 वर्षांचे आहेत आणि ते या महिन्याच्या 6 तारखेला 41 वर्षांचे होणार आहेत. डेक्कन चार्जर्स हैदराबाद, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या एडवर्ड्सचा जन्म 6 फेब्रुवारी 1982 रोजी झाला. 
 
आयपीएलमधील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक असलेल्या अमित मिश्राचाही जुन्या खेळाडूंच्या यादीत समावेश आहे, ज्याचे वय सध्या 39 वर्षे आहे. त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1982 रोजी झाला. अमित मिश्रा डेक्कन चार्जर्स हैदराबाद, सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्ससाठी आयपीएल खेळले आहे. 
 
भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतचे देखील आयपीएल 2022 मेगा लिलावासाठी नाव देण्यात आले आहे आणि ते  देखील सर्वात वयस्कर क्रिकेटपटूंपैकी एक आहे, ते  सध्या 38 वर्षांचा आहे, परंतु ते  6 फेब्रुवारी रोजी 39 वर्षांचे  होणार. श्रीसंत वर दीर्घकाळ बंदी घालण्यात आली असून ते किंग्ज इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरळ आणि राजस्थान रॉयल्सकडून आयपीएलमध्ये खेळले आहे. 
 
वेस्ट इंडिजचा माजी अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्राव्हो,ते सध्या 38 वर्षांचे आहे, ते IPL 2022 मेगा लिलावासाठी शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये पाचवा सर्वात वयस्कर खेळाडू आहे. त्यांचा जन्म 07 ऑक्टोबर 1983 रोजी झाला. ब्राव्हो मुंबई इंडियन्स, गुजरात लायन्स आणि चेन्नई सुपर किंग्जकडून खेळले आहे.