शुक्रवार, 8 डिसेंबर 2023
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 16 मे 2023 (09:52 IST)

लखनौ मध्ये अर्जुन तेंडुलकरला कुत्रा चावला, ट्विटरवर शेअर करून माहिती दिली

शतकातील महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकरला लखनौ मध्ये कुत्र्याने चावा घेतला. लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाउंटवर सोमवारी त्याने ही माहिती दिली. अर्जुन ने सांगितले की त्याच्या बोटाला कुत्रा चावला. 
 
अर्जुनला कुत्रा चावल्यावर सोमवारी लखनौ सुपरजायंट्सच्या ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला या व्हिडीओ मध्ये अर्जुन तेंडुलकर अटलबिहारी बाजपेयी एकना स्टेडियमवर आपल्या सहकाऱ्यांना मिठी मारत आहे. या दरम्यान सहकारी क्रिकेटपटू त्याच्या बोटाला काय झाले असे विचारत आहे. तेव्हा अर्जुन ने सांगितले की काल रात्री बोटाला कुत्र्याने चावा घेतला. कोणतीही मोठी दुखापत झाली नाही.