1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified बुधवार, 24 मे 2023 (23:34 IST)

LSG vs MI : मधवालच्या विक्रमी कामगिरीच्या जोरावर मुंबईने लखनौचा पराभव करून पात्रता फेरीत स्थान मिळवले

ipl 2023
चेपॉक येथे बुधवारी झालेल्या एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सला 81  धावांनी मोठा पराभव करून आयपीएल 2023  मधून बाहेर फेकले. प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने 8 गड्यांच्या मोबदल्यात 182 धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौ सुपर जायंट्सचा संपूर्ण संघ 16.3 षटकांत 101 धावांवर गारद झाला. आकाश मधवालने 5 बळी घेतले आणि लखनौच्या एकाही फलंदाजाला अर्धशतक झळकावता आले नाही. मार्कस स्टॉइनिसने सर्वाधिक धावा केल्या, त्याने 27 चेंडूत 42 धावा केल्या.