Kohli Ganguly controversy कोहली-गांगुली वादाला नवे वळण
बंगळुरू येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर शनिवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यानंतर स्टार फलंदाज विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्सचे क्रिकेट संचालक सौरव गांगुली यांच्याशी हात मिळवण्यास नकार दिला. RCBच्या विजयानंतर सर्व खेळाडू खिलाडूवृत्तीचे हावभाव म्हणून हस्तांदोलन करत होते, पण विराट कोहलीने त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याचा व्हिडिओ फटाक्यासारखा व्हायरल झाला.
दरम्यान, आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये विराट कोहली सौरव गांगुलीकडे रागाने पाहत होता आणि त्याला लाल डोळे दाखवत होता.
व्हिडिओबद्दल बोलायचे झाले तर हा 15 एप्रिलला झालेल्या सामन्याचा व्हिडिओ आहे. विराट कोहली दिल्ली संघाच्या डगआऊटजवळ क्षेत्ररक्षण करत होता आणि झेल घेतल्यानंतर त्याने सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगला लाल डोळे दाखवले. विराट कोहलीचा हा ज्वलंत अवतार होता जो चाहत्यांना या सामन्यात पहायचा असतो. अशा मोठ्या टूर्नामेंटमध्ये या सर्व गोष्टी कॉमन असतात. मात्र, या दोघांमध्ये काही वैयक्तिक वैर सुरू आहे, त्यामुळे हा व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे.
काय आहे विराट कोहली-सौरव गांगुली प्रकरण?
चेतन शर्माने क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली आणि भारताचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यातील अहंकाराचा मोठा संघर्ष उघड केला होता. चेतन शर्मा म्हणाले होते की कोहलीला वाटते की तो बोर्डापेक्षा वरचा आहे. सप्टेंबर 2021 मध्ये कोहलीने विश्वचषकानंतर T20 आंतरराष्ट्रीय संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने वाद सुरू झाला.
गांगुलीच्या भूमिकेमुळेच कोहलीला कर्णधारपद काढून घेण्यात आल्याचे त्याने म्हटले होते आणि त्यामुळेच त्याने दक्षिण आफ्रिकेतील पत्रकार परिषदेत गांगुलीला प्रत्युत्तर दिले. चेतन शर्माने कोहली खोटारडे असल्याचा आरोप केला आणि सांगितले की, त्याला कर्णधारपद सोडू नका असे आधीच सांगण्यात आले होते. तसेच गांगुलीने विराटला कर्णधारपद सोडू नका असे सांगितले. पण यामुळे कोहलीचा अहंकार दुखावला आणि परिणामी विराटने पत्रकार परिषदेत गांगुलीवर कर्णधारपद काढून घेतल्याचा ठपका ठेवला.