1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: मंगळवार, 23 मे 2023 (12:55 IST)

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी दाखवले आपले गायन कौशल्य

IPL 2023 च्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या पराभव झाल्यामुळे मुंबई संघ प्ले ऑफ मध्ये पोहोचला आहे. मुंबईचा सामना एलिमिनेटर मध्ये लखनौ सुपरजायंट्सशी होणार आहे. प्लेऑफ मध्ये आल्यामुळे संघात आनंदाचे वातावरण आहे. संघाचे खेळाडू सेलिब्रेशन करत आहे. खेळाडूंचा सेलिब्रेशनचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये कर्णधार रोहित शर्मासह अन्य खेळाडू रील बनवताना दिसत आहे.

br /> सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा , सूर्यकुमार यादव , नेहाल वढेरा आणि अन्य खेळाडू गाणे गातांना दिसत आहे. हे खेळाडू कैलाश खैर यांचा सैया हे गाणे गातांना दिसत आहे. 
 
या व्हिडीओ ला नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे. ते आपल्या प्रतिक्रिया देत आहे.  
 







Edited by - Priya Dixit