बुधवार, 22 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. आयपीएल 2023
Written By
Last Modified: रविवार, 28 मे 2023 (14:12 IST)

स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड विवाहबंधनात अडकणार

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. निवड समितीने त्याचा स्टँडबाय संघात समावेश केला होता. मात्र, तो आता बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आयपीएल2023 मध्ये भरपूर धावा करणारा राजस्थान रॉयल्सचा स्टार फलंदाज यशस्वी जैस्वाल स्टँडबाय संघ म्हणून लंडनला जाणार आहे. मात्र, बीसीसीआयने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही.
 
26 वर्षीय ऋतुराज आयपीएलनंतर 3 जूनला लग्न करणार आहे. त्यामुळे त्याला अंतिम फेरी गाठता येणार नाही. भारतीय संघासोबत लंडनला जाणार्‍या तीन राखीव खेळाडूंमध्ये ऋतुराजचा समावेश होता. आता ऋतुराजच्या जागी यशस्वी लंडनला जाणार आहे.
 
ऋतुराज अखेर कोणाशी लग्न करणार आहे कोण आहे ती मुलगी हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. 
तर ऋतुराज जिच्याशी  लग्न करणार आहे , तिचे नाव उत्कर्षा आहे. दोघेही एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. ऋतुराज उत्कर्षासोबत बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये आहे.
उत्कर्षा एका जिम सेशनमध्ये ऋतुराजसोबत दिसली होती. पण तिचे फोटो सोशल मीडियावर दिसले नाही. या बाबतीत कोणतीही चर्चा ऋतुराज ने केली नाही. 

ऋतुराज गायकवाडचे अनेक अभिनेत्रींसोबत लिंक अप असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. पण मे 2021 मध्ये, मराठी अभिनेत्री सायली संजीवसोबत त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर झालेल्या संभाषणामुळे दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या अफवा पसरल्या मात्र दोघांनीही काहीही बोलले नाही .
 
 
Edited by - Priya Dixit