शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

आज पंजाब-दिल्ली संघात सामना

WD
प्ले ऑफ फेरीची अद्यापि संधी असलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या दोन संघात गुरुवार, 16 मे रोजी सहाव्या आयपीएल स्पर्धेतील ट्वेंटी-20 साखळी क्रिकेट सामना खेळला जात आहे.

पंजाब संघाचे 14 सामन्यातून 12 गुण झालेले आहेत. या आयपीएलमधील आणखी दोन सामने त्यांचे शिल्लक आहेत. त्यापैकी हा एक सामना आहे. हे दोन्ही सामने जिंकले तर पंजाबचे 16 गुण होऊ शकतील आणि इतर संघ पराभूत झाले तर पंजाबला प्ले ऑफ फेरीची संधी मिळेल, अशी दुर्दम्य आशा पंजाब संघ करीत आहे.

दिल्ली संघ यापूर्वीच या स्पर्धेतून बाहेर पडल्यासारखा आहे. त्यांनी 14 सामन्यातून फक्त तीन विजय मिळविले आहेत व 6 गुणांसह हा संघ आठव्या स्थानावर आहे. चेन्नईविरुद्ध त्यांचा सामना काल खेळला गेला. या सामन्यात दिल्ली संघाला 33 धावांनी पराभव पत्करावा लागला. दिल्लीचे गोलंदाज चेन्नईला कमी धावसंख्येत रोखू शकले नाहीत आणि दिल्लीचे फलंदाज चेन्नईचे विजासाठी दिलेले 169 धावांचे आव्हान पार करू शकलेले नाहीत.

प्ले ऑफ फेरीच्या पहिल्या तीन स्थानावर चेन्नई, मुंबई आणि राजस्थान यांनी आपला हक्क सांगितलेला आहे. चौथ्या स्थानासाठी मात्र बंगळुरू, हैदराबाद, पंजाब आणि माजी विजेता कोलकाता संघामध्ये अद्यापि चुरस आहे. धर्मशाला हे यजमान पंजाब संघाचे दुसरे मैदान आहे. पंजाबने पुढच्या दोन लढतीतही जोरदार कामगिरी अपेक्षित धरली आहे. कर्णधार अँडम गिल‍ ख्रिस्टने शानदार अशा नाबाद 85 धावा केल्यामुळे पंजाबचा संघ बंगळुरूच्या संघाला खडे चारू शकला.

कोलकाता संघाकडेसुद्धा कर्णधार गंभीर, कालिस आणि नरीनसारखे सामना फिरवून देणारे खेळाडू आहेत. 175 धावांचा पाठलाग करताना गिलीला अझहर महामूदने साथ दिली. डेव्हिड मिलेर याने अपेक्षाभंग केला.

सामन्याची वेळ : रात्री 8 वाजता