बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. खेळ मराठी
  4. »
  5. बातम्या
Written By वेबदुनिया|

मुंबई अंतिम फेरीत

राजस्थानवर 4 गडी राखून मात

WD
ड्वेन स्मिथच्या 44 चेंडूवर 6 चौकार 2 षटकारासह काढलेल्या तडफदार 62 धावांमुळे मुंबई इंडियन्सने सहाव्या आयपीएल स्पर्धेची अंतिम फेरी ठली.

रविवार, 26 मे रोजी याच मैदानावर चेन्नई आणि मुंबई संघात विजेतेपदासाठी अंतिम लढत खेळली जाईल. काल खेळल्या गेलेल्या दुसर्‍या क्वॉलिफायर ट्वेंटी-20 क्रिकेट सामन्यात मुंबईने राजस्थान रॉयल्सचा 1 चेंडू आणि 4 गडी राखून पराभव केला.

विजयासाठी 166 धावांचा पाठलाग करताना स्मिथ आणि आदित्य तारे या दोघांनी 9.1 षटकात 70 धावांची सलामी दिली. कुपरने ही जोडी मोडली. त्याने तारेला बाद केले. तारेने 27 चेंडूत 3 चौकार 2 षटकारासह 35 धावा काढल्या. स्मित आणि दिनेश कार्तिकने दुसर्‍या जोडीस 30 चेंडूत 55 धावांची भर घातली. कुपरनेच कार्तिकला (17 चेंडू 3 चौकार 22) टिपले. स्मिथ आणि कर्णधार रोहित शर्माने 128 पर्यंत धावसंख्या नेली. त्यावेळी मुंबईला 25 चेंडूत 37 धावांची विजयासाठी गरज होती.

परंतु, सिध्दार्थ त्रिवेदीने कर्णधार शर्माचा (2) त्रिफळा घेऊन मुंबईला का दिला. स्टुअर्ट बिन्नीने स्मिथला बाद करून मुंबईला अडचणीत आणले. फॉल्कनेरने पोलार्डला (1 षटकारासह 11) झटपट टिपले. मुंबईला 12 चेंडूत 23 धावांची गरज होती. शेन वॅटसनने अंबाटी राडूचा (11 चेंडू 1 चौकार 1 षटकार) त्रिफळा घेतला. त्यावेळी मुंबईचा संघ विजय मिळविणार की नाही, अशी शंका होती. परंतु, शेवटच्या षटकात विजयासाठी 8 धावांची गरज होती. त्यावेळी राडू बाद झाला. रिशी धवन याने 1 चौकार घेतला. शेवटी 3 चेंडूवर 2 धावांची गरज होती. त्यावेळी हरभजनने षटकार खेचून मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

राजस्थानकडून कुपरने 33 धावात 2 तर फॉल्कनेर, वॅटसन, सिध्दार्थ त्रिवेदी, स्टुअर्ट बिन्नी यांनी प्रत्येकी एक गडी टिपला. मॅन ऑफ दि मॅच हरभजनसिंग